पॅकेजवर विश्वास नाही, आवश्यक असेल ती मदत करणार – उद्धव ठाकरेंचे आश्वासन

CM Uddhva Thackeray

रत्नागिरी :- तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन – तीन दिवसात पूर्ण होतील. त्याचा अहवाल आल्यानंतर मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. मात्र, पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे आवश्यक आहे, ते करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav  Thackeray) यांनी रत्नागिरी येथे दिले.

उद्धव ठाकरे नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणाच्या दौऱ्यावर (Konkan Tour) आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ते म्हणालेत, – करोना संकट असताना चक्रीवादळाने त्यात भर टाकली आहे. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवले जाईल. मदतीचे निकष बदलण्याबाबत पंतप्रधान मोदींसोबत बैठकीत बोललो होतो, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे.

मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणालेत, मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलो नाही. कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलो नाही.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button