उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदारांसोबत बैठक, रवींद्र वायकर यांची समन्वयक पदी नियुक्ती

Ravindra Vaikar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर (Ravindra Vaikar) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

वायकर यांच्यावर आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मात्र, या मागण्यांचा योग्य पाठपुरावा झाला नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची नियुक्ती केली.

दरम्यान , रवींद्र वायकर यांनी याआधी युती सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER