संजय राऊतांच्या खांद्यावर पुन्हा शिवसेनेची मोठी जबाबदारी ; शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर

Sanjay Raut & Uddhav Thackeray

मुंबई :  सचिन वाझे प्रकरणात राज्यातील ठाकरे सरकार मोठ्या संकटात सापडले आहे . यात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सतत भाजपाकडून निशाणा साधण्यात येत आहे .

अशातच माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू ठामपणे मांडणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे, संजय राऊत(Sanjay Raut) वगळता इतर कोणीही नेते या प्रकरणात जास्त भाष्य करताना दिसत नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे (list-of-new-official-spokesperson-of-shivsena).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यांच्या आदेशाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्त्यांबरोबर अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यात खासदार प्रियंका चतुर्वैदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत. त्याचसोबत महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)
किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)
संजना घाडी (नवीन वर्णी)
आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)

नव्या यादीत कोणाला स्थान नाही?

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

ही बातमी पण वाचा : शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी संजय राऊत राष्ट्रवादीवर आगपाखड करतायेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button