उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही; संत-महंतांचे कंगनाला समर्थन

Kangana Ranaut & Uddhav Thackeray

अयोध्या : महाराष्ट्र सरकार आणि कंगना रणौत  (Kangana Ranaut) यांच्या वादात अयोध्येतील संत-महंतांनी उद्धव ठाकरे यांचा विरोध केला आहे. महंत ऋषी म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अयोध्येत आले तरीही त्यांचे स्वागत केले जाणार नाही; त्यांना विरोधाला सामोरे जावे लागेल. या मुद्यावर संतांनी कंगना  रणौत  हिचे समर्थन केले असून महाराष्ट्र सरकारच्या वर्तनावर टीका केली.

हनुमान गढीचे महंत राजू दास म्हणाले की, आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे (Shivsena) अयोध्येत स्वागत होणार नाही. उद्धव ठाकरे अयोध्येत आले तर त्यांना विरोधाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्र सरकारने कंगनाच्या विरुद्ध लगेच कारवाई केली. पण, पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्या आरोपींवर मात्र अद्याप काहीही कारवाई केली नाही.अयोध्या संत समाजाचे प्रमुख महंत कन्हैया दास यांनीही महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले. ते म्हणाले की, सध्याचे महाराष्ट्र सरकार अशा लोकांचा बचाव करीत आहे, जे देशविरोधी कार्यात सहभागी आहेत. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत प्रवेश करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

महंत कन्हैया दास यांनी पत्रक कडून घोषणा केली – उद्धव ठाकरे यांचे यापुढे अयोध्येत स्वागत होणार नाही. शिवसेना कंगनावर हल्ला का करत आहे हे प्रत्येक जण समजू शकतो. त्यात काही रहस्य नाही. शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातली राहिली नाही. विश्व हिंदू परिषदेनेही कंगनाचे समर्थन करणारे निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे – कंगनावरील कारवाईचा अर्थ असा आहे की, शिवसेना मुद्दाम असे करत आहे.

कंगनाने सुरुवातीपासूनच राष्ट्रहिताच्या विचारसरणीला पाठिंबा दर्शविला असून मुंबईच्या ड्रग माफियांच्या विरोधात आवाज उठविला आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कंगना  रणौत  हिच्याविरुद्ध सूड भावनेने कारवाई करत आहे. कंगनाने महाराष्ट्राची तुलना पाकिस्तान अधिकृत काश्मीरशी केली.

यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कंगनाला शिवीगाळ केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी कंगनाला ‘हरामखोर’ म्हटले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनेही कंगनाविरुद्ध अमलीपदार्थांच्या वापराबद्दल आदेश जारी केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाला  मुंबईत पाय न ठेवण्याची धमकी दिली. या धमकीला न जुमानता कंगना बुधवारी मुंबईत आली. त्याआधीच मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा एक भाग पूर्णपणे पाडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER