उद्धव ठाकरे आणि त्यांचा पार्टनर जमीन घोटाळा करणार होते – किरीट सोमय्या

Kirit Somiya & Uddhav Thackeray

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची मुख्यमंत्र्यावरील आरोपाची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये.आता किरीट सोमय्या यांनी जमीन खरेदीत मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) व त्यांच्या पार्टनरनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने 2100 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली जाणार होती. मात्र, भाजपने वेळीच हा घोटाळा समोर आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा व्यवहारच रद्द केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कथित घोटाळ्याची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. या जमीन घोटाळ्यात मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांचे भागीदार असणाऱ्या बिल्डरकडून जमीन खरेदी करणार होती. या माध्यमातून मिळणारे पैसे अर्धे-अर्धे वाटून घ्यायचेही ठरले होते. त्यासाठी मातोश्रीवर बैठकही झाली होती. मी आणि पालिकेतील काँग्रेसच्या गटनेत्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यामुळे हा घोटाळा झाला नाही. मात्र, या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER