उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले; नारायण राणेंचा घणाघात

Raj Thackeray - Uddhav Thackeray - Narayan Rane

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बुधवारी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे (Raj Thackeray) यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. या मुद्द्यावरून उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. अनेकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. आता भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मोठ्या मनाने कुठलीही अडचण येऊ दिली नाही. सर्व प्रकारच्या परवानग्या तत्काळ देण्यात आल्या. मात्र आता भूमिपूजनावेळी त्यांना बोलावण्यात आले नाही. जितका सन्मान मुख्यमंत्र्यांचा असतो तेवढाच सन्मान विरोधी पक्षनेत्याचाही ठेवावा लागतो, हे उद्धव ठाकरे विसरले असतील. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षातील नेते असल्याने सूडबुद्धीने त्यांना बोलावण्यात आले नसेल हे आम्ही समजू शकतो. मात्र ठाकरे घराण्यातील सदस्य असलेले राज ठाकरेंनाही बोलवले नाही. त्यांच्या घरासमोर कार्यक्रम असताना त्यांना निमंत्रण न देणे म्हणजे कोत्या मनाचे राजकरण होय, असा टोलाही त्यांनी लगावला.

नागरिकांना, लोकांना मानसन्मान देऊन त्यांनी बोलायला हवं. आता दिवसा नाही रात्री लॉकडाऊन करणार आहेत. माणसं दिवसभरातून काम करून संध्याकाळी घरी जातात. मी मातोश्रीमध्ये बसतो, तुम्ही आपल्या घरात बसा, मग जेवायची सोय काय आपली? जेवायची व्यवस्था सगळी येते. कोरोनामुळे सरकारनं नाक कापलेच, पण महाराष्ट्र राज्य आर्थिक बाबतीत मागे गेले. मुख्यमंत्री आणि या सरकारमुळे राज्य अधोगतीकडे गेले. लॉकडाऊन राज्याला आता पेलवणार नाही. सगळे उद्योगपती आज कोलमडलेत, याची चिंता यांना आहे की नाही? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला.

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंवरही गंभीर आरोप केलेत. महिन्याला १०० कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखांकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती, सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता? जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता? एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल. युनूस या अतिरेक्याच्या हत्येतही वाझेचा समावेश होता. एक एपीआय सचिन वाझे ओबेरॉयमध्ये राहू शकतो. तो जिथे राहायचा त्या ओबेरॉयच्या कॅमेऱ्यामध्ये एका बाईचा फोटो आहे. ती भाईंदरला राहणारी आहे. एनआयएनं तिच्या भाईंदरच्या घरीही छापा मारला. ती बाई आणि ओबेरॉयमध्ये येणारी बाई सारखीच आहे. ती बाई वाझेसोबत कोणतं काम करत होती?

या सरकारला एवढे दिवस माहीत नव्हतं काय? वाझेचे किती फ्लॅट आहेत माहीत नाही, मध्यमवर्गीयांना साधी चाळीत रूम घेणं अवघड आहे. पण वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट आहेत. अशा माणसाला खात्यात घ्यायचं काम शिवसेनेनं केलंय. वाझेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. सुशांत सिंगपासून दिशा सालियानपर्यंत, पूजा चव्हाणपासून मनसुख हिरेनपर्यंत किती हत्या आहेत? एखाद्या गॉडफादरशिवाय पोलीस अधिकारी असं करूच शकत नाहीत. पोलीसच हत्या करत आहेत. किती पोलीस त्यात आहेत माहीत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button