उद्धव ठाकरेंची भाजपसोबत मैत्री वाढतेय का? विखेंच्या पुस्तक प्रकाशनास नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्रीही सहभागी होणार!

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

अहमदनगर : भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे पिता, लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्‍यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्‍यासह मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्‍यासह सर्वच पक्षांचे मान्‍यवर नेते या व्‍हर्च्‍युअल रॅलीत सहभागी होणार आहेत.

प्रकाशन सोहळ्याचा मुख्‍य कार्यक्रम सोशल डिस्‍टसिंगचे नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्‍न होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. या आत्‍मचरित्राच्‍या प्रकाशन सोहळ्यास मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी विखे पाटील परिवाराची विनंती मान्‍य करुन या व्‍हर्च्‍युअल रॅलीत सहभागी होणार असल्‍याचे कळविले आहे.

जिल्‍ह्यात १४ तालुक्‍यामध्‍ये या व्‍हर्च्‍युअल रॅलीत सर्वांना सहभागी होता यावे यासाठी प्रवरा परिवाराच्‍या वतीने कोरोना नियमावलीचे पालन करुन नियोजन करण्‍यात आले आहे. तसेच समाज माध्‍यमांवरही हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्‍यात आली आहे.

प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात हा सोहळा संपन्‍न होणार आहे. या कार्यक्रमास प्रामुख्‍याने पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांच्‍या समवेत काम केलेल्‍या राज्‍यातील मान्‍यवर नेत्‍याना विशेष निमंत्रीत करण्‍यात आले आहे. राज्‍यातील सर्व पक्षांच्‍या खासदार, आमदारांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्‍यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER