शरद पवारांनी हटकल्यानंतर उद्धव ठाकरे – अजित पवार यांची बैठक

शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची आता प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे

Uddhav Thackeray-Ajit Pawar

मुंबई : जून 1 ला अनलॉक – 1 सुरू झाल्यानंतर महिन्याभरानंतर अजून शिथिलता मिलेल या आशेवर तमाम नागरिक होते. 30 जूनपुर्वी शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर सार्वजनीक वाहतूक सुरू होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, 30 जून नंतरही अनलॉक -2 सुरू न होता पुन्हा लॉकडाऊनमध्येच राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महिन्याभरात जेथे जे दसे होते तसेच राहणार असे जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आगाडी सरकार स्थापनेतील मुख्य भूमिका बजावणार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या लॉकडाऊनच्या घोषमेवर नाराजी व्यक्त करत त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

या संवादानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले.

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची आता प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER