उध्दव सरकार आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या प्रस्तावालाही स्थगिती देईल!

Aaditya And Uddhav Thackeray

मुंबई : राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी भाजपा शेतक-यांचे प्रश्न आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांवरून आक्रमक झाली होती. शेतकरी कर्जमाफी, अनेक विकासात्मक कामांना स्थगिती यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. महाविकासआघाडीचं हे सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे. आदित्य ठाकरेंनी लग्नाचा प्रस्ताव दिला तरी त्यालाही स्थगिती मिळेल, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी हाणला आहे. अब की बार बाप बेटे की सरकार, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मोदींनी पाळलेला साप त्यांनाच डसणार – असदुद्दीन ओवेसी

महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाचे मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू आह. यावेळी भाजपा नेते माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारच्या सीएए विरोधी भूमिकेवरूनही मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर तोफ डागली.

‘उद्धव ठाकरे मोदींकडून सीएए आणि एनपीआर समजून घेतात. तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसणाऱ्यांनाही समजवा’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना झालेल्या वृक्षारोपणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तुमच्या चौकशीला घाबरत नाही, ७ पिढ्या चौकशी करा, असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं.

‘मागचं सरकार हे फक्त फडणवीसांचं नव्हतं, शिवसेनेचं होतं. मागच्या सरकारमध्ये शिवसेना मिस्टर इंडिया नव्हती. शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे,’ अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.