वृद्ध शिक्षिकेने मदत मागताच विद्यार्थी राहिलेल्या उद्धव आणि राज ठाकरेंकडून तात्काळ दखल

Raj Thackeray - Suman Randive - Uddhav Thackeray

मुंबई :- नुकताच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिक्षिका राहिलेल्या रणदिवे बाईंनी मदतीची याचना केली होती. विद्यार्थी राहिलेल्या अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपर्क साधला आहे. तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं.

मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने सुमन रणदिवे (Suman Randive) या मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेला संपर्क साधून आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडूनही रणदिवे बाईंशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडूनही मदतीचं आश्वासन देण्यात आलं.

तौत्के चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) कोकणासह मुंबई उपनगरालाही तडाखा बसला आहे. या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे या ९० वर्षांच्या आहेत. सुमन सध्या वृद्धाश्रमात आहेत. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तोत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button