बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे…: उदयनराजे भोसले

Udyanraje

सातारा :- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे .

बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आलेली आहे. मंडल आयोगाच्या वेळी काय घडलं हे प्रत्येकाला माहीत नाही. मुद्दा मी उपस्थित केला असता तर माझ्यावर भडिमार केला असता, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सर्व जातींना एकत्र केलं पाहिजे. हा राज्याचा प्रश्न आहे ते राज्याने सोडवला पाहिजे, असंगही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

मी आणि संभाजी राजे बघतील असं बोलून बंदूक आमच्या खांद्यावर दिली. मराठा आरक्षण दिरंगाईला सर्व आमदार आणि खासदार जबाबदार असल्याचे उदयनराजे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : … महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र राहणार नाहीत – उदयनराजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER