उदयनराजे पवारांच्या भेटीला; मात्र पवारांनी दिला ‘वेट अँड वाच’ चा सल्ला!

udayanraje meet pawar; but pawar said wait and watch

पुणे : सातारा लोकसभा मतदारासंघातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी बैठक बोलवली होती. या बैठकीला विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. या बैठकीत आपल्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या अन्य नेतेमंडळांनी विरोध केल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट पुणे गाठले. सायंकाळी ६ वाजता पुण्यातील मोदीबाग या विश्रामस्थानी पवार आणि उदयनराजे यांचीही लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. त्यावेळी, सकाळच्या बैठकीबाबत उदयनराजेंनी पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्यावर शरद पवारांनी त्यांना ‘वेट अँड वाच’ चा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली पवारांची भेट

दरम्यान, रविवारी शरद पवार हे सातारा येथे आले असता त्यांनी उदयनराजेंशी बोलणे टाळले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना उदयनराजे यांनी थेट पवारांना इशारा दिला होता. ‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं’ असा इशारा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेबांना दिला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र आपलं उदयनराजेंशी कुठल्याच मुद्द्यावर बोलणं झालं नसल्याची स्पष्टोक्ती खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजे यांची पुढील राजकीय वाटचाल कुठल्या दिशेने जाणार हे वेळच सांगणार आहे.

ही बातमी पण वाचा : ‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं’;उदयनराजेंचा पवारांना इशारा