आप्तेष्टांच्या लग्नात उदयनराजेंची फडणवीसांशी गळाभेट ; राज ठाकरेंचीही हजेरी

नाशिक : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, जयकुमार रावलही उपस्थित होते.

नाशिक महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे भाजपला टाळी देणार आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या आप्तांच्या लग्नाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांची भेट घेऊन चर्चा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER