रस्ता कधी सुरू होणार? उदयनराजे हिंदी डायलॉग म्हणाले, ‘अभी के अभी’

Udayanraje-Bhosale

मुंबई : भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी आज सातारा शहरातील पोवई नाका (Satara Powai Naka) येथील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करून सर्वांना धक्का दिला. मी ‘आदत से मजबूर’ असून असे धक्के द्यायची मला सवय आहे. कधी कधी हे धक्के मी देतो आणि कधी कधी हे धक्के मलाही बसतात, असे उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये सांगितले .

सर्वसामांन्यासाठी हा रस्ता कधी सुरू होणार, याबाबत बोलताना हिंदी चित्रपटातील ‘अभी के अभी’ हा डायलॉगदेखील त्यांनी मारला . यावेळी उदयनराजे यांनी कॉलर उडवत, जशी इतरांची स्टाईल असते, तशी माझीही स्टाईल आहे. मला कोणी शाबासकी देवो अगर ना देवो ही माझी पद्धत आहे, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER