ना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड- उदयनराजे भोसले

Sanjay Raut-Udyanraje Bhosale

मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार (Brand Pawar) नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडं पडले आहे, अशी भूमिका मांडली .

यावर खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड (Maharashtra Brand) असल्याचे उदयनराजे म्हणाले .
जनतेला केंद्रबिंदू मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले. त्यांनी असे म्हटले असते तर स्वराज्य उभा राहिले असते का?, असा सवालही उदयनराजेंनी विचारला आहे.

रयतेचा राजा बनून शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) राज्य केले , सर्वसामान्यांच्या मनात घरं केले , असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत’ ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER