मराठा आरक्षण : आता लीड घेतलं पण गळ्याशी आलंय : खा. उदयनराजे

सातारा : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी येत्या लवकरच मराठा नेत्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीच्या नियोजनासाठी खा. उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मराठा आरक्षणासाठी मी पहिल्यापासून लीड घेतलं, पण आता गळ्याशी आलं आहे. दोन दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत सर्वांसमोर मराठा आरक्षणासंदर्भात कोणी राजकारण केलं किंवा होऊ नये यासाठी व्हाईट पेपर पब्लिश करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती. यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांत चर्चा झाली.

खा. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने लक्ष घालावे, या संबंधीच्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये, तशा सक्त सुचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. तसेच विविध मुद्यांवर श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी उदयनराजे केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER