मराठा आरक्षण : उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पाच प्रश्न

Uddhav Thackeray-Udayanraje Bhosle

मुंबई :- मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का? जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ? ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ? महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबंधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत.

जेणेकरून खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल. आणि एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही? असे सवाल उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. आता मुख्यमंत्री याप्रश्नांची उत्तरे कधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांनंतर उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER