मनसेने सांगितली ‘अंदर की बात’; …म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली

udayanraje-bhosale-meet-raj-thackeray

मुंबई: खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी ‘कृष्णकुंज’वर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते . यानंतर मनसेकडून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली, अशी माहिती मनसेने दिली.

या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला, अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER