राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच पवार-उदयनराजेंनी भेट, चर्चेला उधाण

Udayanraje-Sharad Pawar

नवी दिल्ली :- राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोडचिठ्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात भेट होणार आहे. आज उदयनराजे भोसले स्वतः शरद पवार यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेणार आहेत. उदयनराजेंनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उदयनराजे आणि शरद पवारांची ही भेट नेमकी कुठल्या विषयावर होणार आहे याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न नक्की साकार होईल ; राष्ट्रवादीकडून दिल्लीच्या निवडणूकीची तयारी सुरू!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER