…तर खंबीर मराठा समाज ठाकरे सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही : उदयनराजेंचा इशारा

Udayan Raje Bhosale.jpg

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha) प्रश्नावरून सध्या वादंग पेटले आहे . जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल, तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराही भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी (Udayan Raje Bhosale) महाविकासआघाडी (Mahavikas aghadi) सरकारला दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने काही काळ कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही, असेच सिद्ध होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद असल्याची टीकासुद्धा उदयनराजेंनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणा केलीय. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीला हजरच नव्हते. त्यामुळे कोर्टाने काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. आता तरी सरकारने तातडीने ठोस पाऊले उचलावीत. अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचेही उदयनराजें म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER