शिवसेना नाव काढून ‘ठाकरे’सेना करा : उदयनराजे

uddhav Thackeray-Udayanaraje Bhosale

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या ‘आज का शिवाजी नरेन्द्र मोदी’ या पुस्तकाबाबत आज भाजपा नेते आणि माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवरही निशाणा साधला .

‘सतत छत्रपतींच्या वंशजांवर टीका केली जाते. मग शिवसेना जेव्हा काढली तेव्हा नाव देताना विचारलंत का? किंवा महाशिवआघाडीला नाव देताना आणि त्यातून शिव काढताना आम्हाला विचारलं का? आम्ही कधी हरकत घेतली का?’ असा सवाल उदयनराजेंनी यावेळी केला. तसेच ‘शिवसेनेतून ‘शिव’ काढून दाखवाच आणि बघा महाराष्ट्रातले किती तरुण तुमच्या पाठीशी येतात.’ असे जाहीर आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिले. ‘सोयीप्रमाणे महाराजांचे नाव वापरणाऱ्यांनो, तुमची लायकी आहे का?’ असा जोरदार घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ या उपमेवरूनही उदयनराजेंनी जोरदार टीकास्त्र सोडले. ‘पुन्हा आमच्या वाटेला गेलात तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, सावध राहा.  तुमची हयगय केली जाणार नाही.’ अशा शब्दांत उदयनराजेंनी छत्रपतींच्या वंशजांवर टीका करणाऱ्या पक्षांना आव्हान दिले. तर ते म्हणाले, ‘महाराजांच्या नावाचा वापर सोयीप्रमाणे केलात तर मी नाही, लोक तुम्हाला मारतील.

जाणता राजा म्हणून महाराजांच्या नावाने राजकारण नको, उदयनराजेंचा पवारांना टोला

शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही, पण निदान प्रबोधनकार ठाकरेंचा तरी मान ठेवावा. ’अशी जोरदार टीका केली. तसेच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही.

छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही, असे उदयनराजे भोसले म्हणाले. तसेच ‘सत्तेसाठी लूथ भरलेल्या कुत्र्यासारखं कोणाच्या मागं पळालो नाही. खासदार म्हणून निवडून आलो.  राजीनामा दिला. माझ्या बुद्धीला जे पटत नाही ते मी करत नाही. माझं नातं सर्वसामान्यांशी आहे.  त्यांच्यासाठी जीव द्यायलाही मी तयार आहे.’ असेही ते म्हणाले.