उदयनराजेंची पवारांसोबत गुपचूप भेट, चर्चेची माहिती देण्यास उदयनराजेंचा नकार

udayan raje - sharad pawar

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. ग्रामपंचायतनिवडणुकांनंतर आता सर्वच पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. आणि अशातच भाजप (BJP) खासदार उदयनराजे (Udayan Raje) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा चालली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी थेट सिल्व्हर ओक गाठून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. मात्र हि भेट कुठल्या मुद्द्यावर झाली याबाबत उदनराजेंनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे.

शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवास स्थानी उदयन राजे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेऊन उदयन राजे सिल्व्हर ओकवर आले होते. शरद पवार आणि उदयन राजे यांच्यात अर्धातास चर्चा झाली. मात्र पवारांच्या भेटीनंतर उदयन राजे यांनी झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यास प्रसारमाध्यमांना नकार दिला

उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. मात्र या भेटीत कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती उदयनराजे प्रसारमाध्यमांना देत असत. मात्र यावेळी त्यांनी कुठलीही माहिती न दिल्याने तर्कवितर्क लावले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER