
सातारा :- उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा (Reservation) अभ्यास कमी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर उदयनराजेंनीही भुजबळांना प्रत्युत्तर दिले आहे.
उदयनराजे म्हणाले, “छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे वयाने मोठे आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे मी मान्य करतो. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही. इतरांबरोबर मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे यात अभ्यास काय करायचा?”
तसेच, “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला.
“व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही. त्यांचा फार मोठा अभ्यास. कॉमन सेन्स त्यांचा काय कुणाचाच, मला त्यांच्यावर आरोप करायचा नाही. पहिल्यापासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला त्यात जायचं नाही. मला एव्हढंच सांगायचं आहे, बाकीच्या समाजाचं जसं आरक्षण आहे, तसं मराठा समाजालाही न्याय मिळायला हवा, त्यात अभ्यासाचं काय?” असा सवाल उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी विचारला.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उदयनराजेंचा अभ्यास कमी आहे, असं भाष्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला