‘मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल !’ चिल्लर दिल्यावर उदयनराजे म्हणाले, दहाची नोट टाक!

सातारा :- राज्य सरकारने (State Govt) लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेतला तर लोक आणि मी एकही शब्द ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो आम्हाला मान्य नाही. यावरून मारामारी किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी सरकार जबाबदार असेल. लोक पोलिसांना मारहाण केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी दिला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथवर बसले होते. या प्रतीकात्मक आंदोलनानंतर भेटायला आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना उदयनराजे खूपच संतप्त झाल्याचे दिसून आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button