उदयनराजेंनी आनंदाच्या भरात वासुदेवाला जादूची झप्पी

Udayan Raje

सातारा :- छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलने आणि डायलॉगबाजीमुळे चर्चेत असतात. तसेच त्यांचे अनेक हटके व्हिडिओ ही गाजलेले आहेत. मग तो बाईक रायडींगचा असो वा कार रायडींगचा. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच गाजले आहेत.

आजवर उदयनराजेंना राजकीय व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक फिल्मी गाणी म्हणतानाही अनेकांनी पाहिले असेल. मात्र त्यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये उदयनराजेंनी चक्क वासुदेवाने गायलेल्या गाण्यावर ठेका धरत गाण्याचा आनंद घेतल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे वासुदेवाने गायलेले गाणं उदयनराजेंना इतकं आवडल की गाणं संपताच उदयनराजेंनी आनंदाच्या भरात वासुदेवाला एक जादूची झप्पीच दिली. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे राजे अशी उदयनराजे यांची ओळख अख्या राज्यात आहे. त्यांनी वासुदेवाला दिलेल्या या जादूच्या झप्पीमुळे कलेची कदर करणारे राजे असेही त्यांचे अनोख रूप सर्वांना पाहायला मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER