
वाई : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट आणण्यासाठी उदयनराजेंनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला त्यामुळे त्याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वेच्या बोगी तयार करण्याच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शासनाची उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे, अशी माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
ही बातमी पण वाचा:- सारथीबाबत मंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी : खा. संभाजीराजे
कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे काम भूसंपादनामुळे ठप्प पडले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या आठ जुलैला पुण्यात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्याच्यासमवेत सुनील काटकर, दत्तात्रेय बनकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासन सर्व काही अटोक्यात आणू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा उद्रेक झाल्यास काय करणार अशी भिती व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, कोरोना रोकण्यासाठी देशातील संशोधक व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करायला हवेत. त्यासाठी मी पंतप्रधानांना ही ईमेलव्दारे कळविले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्ही त्यांना का भेटला नाहीत, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, याची मला कोणी कल्पना दिली नव्हती. लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते. माझ्या ऑफिसला त्यांच्या दौऱ्याचे पत्र यायला हवे होते. त्यांना वाटते आम्हालाच दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही. मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला