उदयनराजे भोसलेंचा फिल्मी अंदाज : बॉक्सिंग बॅगसोबत पंचिंग; म्हणतात, ‘तायक्वांदो प्लेयर… मॅन’

Udayne raje bhosle - Maharastra Today
Udayne raje bhosle - Maharastra Today

मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे जबरदस्त फिल्मी स्टाईल बॉक्सिंग करत असतानाचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील जावळीमध्ये राहणारे आपले मित्र अजीजभाई मुजावर यांच्याकडे गेले होते. त्यावेळी घरातच असणाऱ्या जिममध्ये त्यांनी बॉक्सिंग बॅगबरोबर जोरदार पंचिंग केले . एका तरुणाने पंचिंग बॅग धरली, तर उदयनराजेंनी त्यावर हात साफ केला. त्यानंतर त्याच्याकडे लूक देत ‘तायक्वांदो प्लेयर… मॅन’ असा डायलॉगही उदयनराजेंनी मारला. त्याचप्रमाणे करेल फिरवून दंड मारत आपण स्वतः फिट असल्याचेही उदयनराजेंनी दाखवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button