शरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले

Udayan Raje Bhosle-Sharad Pawar.jpg

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरुन सध्या राजकारण ढवळून निघाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. उदयनराजे भोसले यांनी टीव्ही-९ मराठीशी बोलताना सर्वच मुद्द्यावरून निर्भीडपणे आपली भूमिका स्पष्ट केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातमोठा संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न निकाली काढला गेला नाही नाही तर १८५७ प्रमाणे क्रांती होईल आणि लोक बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावून टाकेल. नेत्यांना मारुन टाकतील, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच शरद पवार यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर मला भाष्य करायचं नाही. अशी स्पष्टोक्ती उदयनराजे भोसले यांनी दिली.

उदयनराजे भोसले म्हणाले, शरद पवार वयाने ज्येष्ठ आहेत आणि माझ्यासाठी आदरणीय आहेत. माझ्याआधी शरद पवार जन्माला आलेत, ते माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवर मो बोलू शकत नाही. मी काही सांगकाम्या नाही, कुणीही सांगायचं आणि मी ऐकायचं. अशी माझी आणि माझ्या घराण्याची ख्यातीही नाही. कोर्ट वगैरे ठिक आहे, त्यांचा अवमान करत नाही पण तेही माणसं आहेत, त्यांनीही विचार करायला पाहिजे. शरद पवार राजकारणातील सर्वात ज्येष्ठ आहेत. मराठा आरक्षणावर त्यांनाच प्रश्न विचारले पाहिजेत. असे उदयनराजे म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “मराठा आरक्षणाला स्थगिती का मिळाली याच्या खोलात मला जायचं नाही. पण कुठल्याही समाजावर अन्याय होता कामा नये. समाज म्हटलं की वेगवेगळ्या जातीजमातीची लोकं असतात. मराठा समाजावर का अन्याय होतोय? उद्या लोक प्रश्न विचारायचं सोडून देतील आणि काय करतील मला सांगता येत नाही. मागे जे मार्चे निघाले ते शांततेत निघाले, आता जे मोर्चे निघाले ते शांततेत निघणार नाही. त्याचा परिणाम स्वतःला फार मोठा पक्ष समजणाऱ्या पक्षांना समजेल. लोक काय करतील मी सांगू शकत नाही.

सध्या लोकशाही आहे. राजेशाही असती तर दाखवलं असतं. माझं एकच म्हणणं आहेअन्याय होत असे तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागायला हवं. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून जाता, तेवढं भान ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. नाहीतर आणा राजेशाही, मग मी दाखवतो, काय करायचं, काय नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर मराठा समाज या सर्व नेत्यांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लावून टाकेल. लोकांमध्ये प्रचंड खदखद आहे. त्यामुळे १८५७ प्रमाणेच राज्यात क्रांती होईल आणि लोकं सर्वांना मारुन टाकतील. नेतृत्व कुणाचंही असो, विचार महत्त्वाचा आहे. सर्व देवांची शपथ घेऊन सांगतो आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर अनर्थ होईल, कुणीही थांबवू शकणार नाही. मला वाटतं तोडगा काढण्याची वेळ आता संपली आहे. ज्यांना आरक्षण द्यावं वाटत होतं ते मागेच द्यायला हवं होतं, नाहीतर परिणामांना सामोरं जावं. परिणाम काय होतील हे पदांवर असणाऱ्यांना विचारा. कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार असो त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लावला नाही. लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. या प्रश्नावर मला संताप येतोय. जर मला संताप येत असेल, तर ज्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न आहे त्यांना किती संताप येत असेल. माझ्यासह कुणालाही विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ करण्याचा अधिकार दिलेला नाही. आता त्यांच्या आयुष्याचं काय होणार यावर विचार केलाय का? बस झालं हे कायदे-बियदे. खड्ड्यात गेले सगळे कायदे, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरुन मराठा समाजातील काही नेत्यांच्याच मनात आरक्षण मिळू नये असल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, प्रकाश आंबेडकर बरोबर बोलले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील मराठा समाजातील काही नेत्यांनाच मराठा आरक्षण नको आहे. त्यांना आपल्या हातातील नेतृत्व गरिब मराठा समाजाच्या हातात जाईल अशी भीती आहे. या लोकांना जनाची नाही किमान मनाची लाज असेल तर त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER