उदयनराजे आणि संभाजीराजे एकाच मंचावर?

Udayan Raje and Sambhaji Raje.jpg

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme court) मराठा आरक्षणाला (Maratha reservation) स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच पेटला आहे . समाजातर्फे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कधीकाळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत.

उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबरपूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असंही माथाडी कामगार (Mathadi workers) नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल.

जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला, मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो. उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत. ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्याचं नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER