उदयनराजेंना आमचा विरोध नाहीच, पण….- अमोल कोल्हे

Udayan-Raje-and-Amol-Kolhe

सातारा : उदयनराजे भोसले यांचा आम्ही कधीही विरोध करत नाही पण राजे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला आमचा विरोध आहे, असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल कोल्हे यांनी केले. अमोल कोल्हे आज साताऱ्याच्या प्रचारसभेत बोलत होते.

ते म्हणाले की, उदयनराजेंना आमचा कधीही विरोध नाही पण भाजपा सरकारच्या काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले, शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या त्यामुळे भाजपाला विरोध आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणतात अब की बार २२० पार मात्र अब की बार २२० पार नाही तर अब की बार तुम्ही सत्तेच्या बाहरं, असं म्हणत अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्राची दिवाळी सुखाने साजरी करायची असेल तर भाजपा-शिवसेनेचं दिवाळं वाजल्याशिवाय महाराष्ट्राची दिवाळी साजरी होणार नाही. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यात आलेलं अपयश लपविण्यासाठी कलम ३७० पुढे करताय. कलम ३७० हा जम्मू काश्मीर आणि लडाखमधील विषय आहे. महाराष्ट्राचे मुद्दे मांडा, कोल्हापुराच्या महापुरामध्ये सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आज तु्म्ही त्यांना थारा देऊ नका, देशाचे विषय राज्यातील निवडणुकीत चालत नाही. बापाचं कतृत्व बघून पोरगी पोरगी देतात का? अशा शब्दात डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात पोहचला आहे. त्यामुळे साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. विशेष म्हणजे दोन्ही राजे भाजपच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात असल्याने भाजप नेत्यांनी मतदारसंघातील फेऱ्या चांगल्याचं वाढवल्या आहेत. उदयनराजे भोसले हे लोकसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जात आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.