पदवी परीक्षांच्याबाबत उदय सामंतयांची राज्यपालांशी चर्चा

Governor & Uday samant

मुंबई : पदवी परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील चर्चा करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी २ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल देखील सकारात्मक आहेत, अशी माहिती सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली.

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांना दिली. गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४:०० वाजता राज्यपालांच्या यांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरुंची बैठक होणार आहे.

परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरू यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, आशा सूचना राज्यपालांनी सामंत याना दिल्या.

vगुरुवारची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल आणि त्यानंतर समितीचा अहवाल सादर केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतचे निर्देश दिल्यानंतर त्यानुसार राज्यात पदवी परीक्षा रद्द न करता परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जावे लागणार नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा हेही सामंत यांच्यासोबत राजभवनावरील बैठकीच्या वेळी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER