मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

Uday Samant - Corona Positive

मुंबई : उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची चाचणी कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आली आहे. मागील आठवड्यात त्यांनी राज्यातील विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. गेले १० दिवस क्वारंटाईन आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. याबाबतची माहिती मंत्री सामंत यांनी ट्विट करुन दिली आहे.

आठवडाभरात बरे होऊ, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले १० दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER