शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद ; शिवसेना नेत्याची टीका

Uday samant-Narayan Rane

मुंबई : कोकणात शिवसेनेचा (Shivsena) एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा करणाऱ्या भाजप नेते नारायण राणेंचा (Narayan Rane) उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी टीकास्त्र सोडले .

आम्ही सर्व तीन-चारदा निवडून आलेलो शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही पराभव कधीच पाहिला नाही. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायचं हे भाजपचं आव्हान आमच्यासाठी फार छोटं आणि कमकुवत आव्हान आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी राणेंना खडेबोल सुनावले आहे .

कोकणात यानंतर शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा फार मोठा विनोद आहे. मी सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांनाही हलक्यात घेत नाही ,राणेंना तर घेणारच नाही, असेही सामंत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER