गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल लावण्याची उदय सामंत यांची घोषणा

Uday Samant

रत्नागिरी/प्रतिनिधी : राज्यात वाढत चाललेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल उभारण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा ठिकाणी टनेल सॅनिटायझरची उभारणी करून निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनी पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. या पद्धतीची टनेल राज्यभरात उभारण्यात येणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.