यु.एस. ओपनमध्ये ओसाका सात वेगवेगळे मास्क घालून का खेळणार?

Naomi Osaka

जपानी (Japan) टेनिसपटू (Tennis) नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने अमेरिकेतील वर्णद्वेषाविरुध्द (Racism) आवाज उठवणे सुरूच ठेवले आहे. युएस ओपन टेनिस (US open tennis) स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यासाठी सोमवारी जेंव्हा नाओमी ओसाका मैदानात उतरली तेंव्हा तिने अमेरिकेतील वर्णविद्वेषाची बळी ठरलेली परिचारिका (Nurse) ब्रिनोना टेलर (Breonna Taylor) हिच्या नावाचा मास्क लावलेला होता. ब्रिनोना या आफ्रिकन – अमेरिकन वंशाच्या नर्सला पोलिसांनी तिच्या केंटूकी येथील घरी मार्चमध्ये छापा टाकला असता गोळ्या घालून मारले होते.

प्राप्त माहितीनुसार ओसाका यशस्वी ठरत गेली तर तिला या स्पर्धेत सात सामने खेळावे लागणार आहेत आणि या प्रत्येक सामन्यासाठी तिने अशा अत्याचारग्रस्तांच्या नावाने वेगवेगळा मास्क बनवला आहे. मात्र या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी हे सातही मास्क पुरेसे ठरणार नाहीत पण या प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल असे ती म्हणते.

या स्पर्धेची माजी विजेती असलेल्या ओसाकाने पहिल्या फेरीच्या सामन्यात आपल्याच देशाच्या मिसाकी दोई हिला 6-2, 5-7, 6-2 अशी मात दिली.

आपल्या या अभिनव आंदोलनाबद्दल ओसाका म्हणते की, मला माहित आहे की टेनिसला जगभरातून दर्शक असतात आणि त्यांना ब्रिनोना टेलरची घटना माहित नाही असे क्वचितच असतील. मला या विषयाकडे लोकांचे लक्ष वेधायचे आहे. जेवढ्या जास्त लोकांना या घटना माहित पडतील तेवढे त्याचे गांभिर्य वाढेल. ती म्हणते की सात मास्क पुरेसे नाहीत पण मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल अशी आशा करते जेणेकरुन जनतेला सातच्या सात मास्क बघायला मिळतील.

या स्पर्धेसाठी या 22वर्षीय खेळाडूला चौथे मानांकन मिळाले आहे. जाॕर्ज फ्लाॕईडच्या हत्येनंतर ती अमेरिकेतील कृष्णवर्णीयांविरुध्दच्या अत्याचाराविरोधातील आंदोलनात सक्रीय झाली. या आंदोलनांमुळे तुझ्यावर तणाव वाढला का असे लोक मला विचारतात पण या प्रश्नाच्या उत्तरात खरे सांगायचे तर तसे काही नाही.

गेल्याच आठवड्यात तिने या अत्याचारांच्या विरोधात वेस्टर्न अँड सदर्न ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीपासून पुढच्या सामन्यात न खेळायची भूमिका घेतली होती. त्यावेळी जेकब ब्लेकच्या हत्येच्या निषेधार्थ तिने ही भूमिका घेतली होती. नंतर ती खेळायला तयार झाली होती पण पोटरीच्या दुखण्याने ती अंतिम सामना खेळू शकली नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER