आयुर्वेदात वर्णित आहाराचे प्रकार

आयुर्वेदात वर्णित आहाराचे प्रकार

पदार्थ इतके वेगवेगळ्या पद्धतीने बनविल्या जातात की ते एखाद्या श्रेणीत विभाजित होत असतील हा विचारही आपण करीत नसतो. आयुर्वेद सूत्र हे एका वाक्यात उत्तरे द्या या पद्धतीने सूत्रबद्ध केले आहेत. ही आयुर्वेदाची खूप मोठी विशेषता आहे. त्रिदोष म्हटले की वातपित्तकफ, त्रिफळा म्हटले की आवळा बेहडा हिरडा हे एका शब्दात कळते वारंवार एवढे शब्द लिहीण्याची गरज नाही. जे शरीर औषधाकरीता तेच आहाराविषयी सुद्धा आहे.

षडरस म्हटले की मधुर अम्ल लवण कटु तिक्त कषाय हे सहा रस. तसेच आहाराचे वर्गीकरण ६ भागात केले आहे.

बघूया आयुर्वेदाची ही विशेषता –

१) भोज्य – चावून खाण्यासारखे पदार्थ म्हणजे भोज्य पदार्थ उदा. वरण भात
२) भक्ष्य – तोडून खाण्यासारखे पदार्थ उदा. पोळी, लाडू बर्फी इ.
३) चर्व्य – चिवडा, भाजलेले चणे, शेगदाणे इ. पदार्थ जे चर्वण करावे लागतात.
४) लेह्य – चाटण्यायोग्य पदार्थ उदा मध च्यवनप्राश, श्रीखंड इ.
५) चोष्य – चोकून रस काढला जाणारे उदा. आंबा, ऊस इ.
६) पानक – सरबत, पेय पदार्थ, पाणी दूध पन्हे इ.

हे सर्व मिळून आपला आहार बनतो. कोणताही पदार्थ या ६ श्रेणी पैकीच असतो. आहारात हे ६ प्रकार असले पाहिजे. यात मुख्यतः चोष्य पदार्थ पचायला हलके तर चर्व्य पदार्थ पचायला जड असतात.

आयुर्वेद शास्त्रात अशा पद्धतीने वर्गीकरण इतके चपलखपणे आहे की सर्व द्रव्य, पदार्थ बरोबर विभागले जातात. आहार षड्रसात्मक असावा व या उपरोक्त सहा प्रकाराचा असावा. एकच रस अधिक मात्रेत घेणे व एकच प्रकार त्रासदायक ठरु शकतात.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER