खेडसारख्या प्रकारांमुळे महाविकास आघाडीत निर्माण होते आहे कटुता – संजय राऊत यांची नाराजी

Mahavikas Aghadi - Sanjay Raut - Maharashtra Today

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt)चांगले काम करत आहे. मात्र, खेड येथे घडलेल्या प्रकरणांमुळे आघाडीत कटूता निर्माण होते आहे, या शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिक कुरघोड्या, राजकारण होत असते. मात्र, ते किती मर्यादेपर्यंत व्हावे, हे निश्‍चित केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राऊत म्हणालेत की, खेडप्रकरणी मी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली नाही किंवा त्यांच्यावर खापर फोडले नाही. खेडचे आमदार दिलीप मोहितेच या प्रकरणाचे सूत्रधार असून, त्यांच्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मी माहिती दिली होती.

मोहिते यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समजावून सांगावे, अशी माझी भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच मी खेड येथे गेलो, असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button