
कोल्हापूर :- कोरोना महामारीमुळे दो गज दुरी पाळणे आवश्यक आहे. हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना माहीत असेल; मात्र इथे दोन फूट काय ? सहा इंच नाही, पण तीन इंच अंतर आहे, अशा शब्दात टोला हाणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुश्रीफ यांची फिरकी घेतली. कोल्हापुरात (Kolhapur) जिल्हा परिषदेतर्फे माजी उपपंप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा अनावरण समारंभात पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्यांतही पवारांच्या उपस्थित कलगीतुरा रंगला.
जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी भाषणात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या सुप्त संघर्षावर बोट ठेवले. हसन मुश्रीफ यांच्या सरपंच आरक्षण पुढे घेण्याच्या निर्णयामुळे गृह खात्याला त्रास झाला नाही. त्यामुळे सतेज पाटील यांचाही त्रास कमी झाला. सतेज पाटील यांना त्रास होणार नाही, ही काळजी मुश्रीफ घेत आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांना नक्कीच चांगले दिवस आले आहेत, असे जयंत पाटील म्हणताच हशा पिकला.
विधानसभा निकाल लागला तेव्हा युतीची सत्ता येणार हे निश्चित होते. आम्ही विरोधात बसणार हे निश्चित होते. त्यावेळी खिडकी उघडली की बाहेर पाऊस आणि टी.व्ही. लावला का राऊत हे सुरू होते; पण शरद पवार, राऊत व पृथ्वीराज चव्हाण यांनी ही किमया केली. आम्ही सत्तेत आलो, असे हसन मुश्रीफ यांनी भाषणात सांगितले. सतेज पाटील यांनी माझे आभार मानले. माझी मदत झाली हे बोलले. त्याची नक्कीच परत फेड पुढच्या भाषणात करणार असल्याचे सूचक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले.
ही बातमी पण वाचा : सुरक्षा व्यवस्था वाढल्याने नारायण राणेंना सुखाने झोप लागेल : शरद पवार यांचा टोला
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला