दोन महिलांनी पाकिस्तानला धडा शिकवला!

संरक्षणमंत्री निर्मला सितारामण आणि परराष्ट्रमंत्री सुशमा स्वराजचे सोशल मिडियावर होतंय कौतूक

Nirmala-Sitharaman-Sushma-Swaraj

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मिरमध्ये घूसून आज पहाटेे भारतीय वायूसेनेनी एअर स्ट्राईक करून पाकीस्तान दहशतवादी जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यांना नेस्तनाबूत केले असल्याची अधिकृत माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

हि बातमी पण वाचा : पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बोलावली बैठक

आज ख-या अर्थाने गूड मॉर्नींग झाल्याच्या प्रतिक्रिया नेटक-.ांनी सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहे. आणि देशाच्या दोन महिलांनी पाकीस्तानला धडा शिकवला असे म्हणत संरक्षणमंत्री निर्मला सितारामण आणि परराष्ट्रमंत्री सुशमा स्वराजचे सोशल मिडियावर भरभरून कौतूक होत आहे.

महिला दिन जवळ येतोय आणि आणि देशाच्या दोन कर्तृत्वान महिलांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय वायुसेनेनी एवढी मोठी कार्रवाई केली आहे. एअर फोर्सने ज्यांच्या नेतृत्वाखाली ही एवढी मोठी कार्रवाई केली त्या दोन स्त्रिया आहेत. किती अभीिमान वाटतोय! असे म्हणत फेसबूक वरून देशाच्या दोन कर्तृत्वान स्त्रियांचा गौरव सोशल मिडियावर होत आहे.

FB POST

भारतीय हवाई दलातील मिराज २००० या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य आणि भारतीय राजकीय व्यवस्था देखील शांत बसणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता. आजच्या वायुसेनेच्या कार्रवाईनंतर मोदींच्या त्या शब्दांची आठवण होणे साहजिक असल्य़ाची प्रतिक्रियाही नेटक-यांनी दिल्या आहेत.

संरक्षणमंत्री निर्मला सितारामण आणि परराष्ट्रमंत्री सुशमा स्वराज यांच्या सोबतच सोशल मिडियावर पंतप्रधान मोदींचही कौतूक होत आहे.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात यावं, अशी भावना देशभरातून व्यक्त करण्यात येत होती.त्यानंतर आता भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे.

पुलमावा इथल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सर्व देश सुन्न झाला. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याने सुरक्षा दलासमोर आव्हान निर्माण झालं आहे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.

हि बातमी पण वाचा : 2 भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या अटकेत; एक रूग्णालयात, पाकिस्तानचा खळबळजनक दावा