सांगलीत रविवारी कोरोनाचे दोन बळी

Sangli Coronavirus Death

सांगली :- कोरोना रुग्णांची वाढ रविवारी मंदावली असलीतरी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. सांगली आणि मिरजेतील प्रत्येकी एका वृध्द महिलेचा समावेश आहे. दरम्यान रविवारी नवे 9 कोरोनारुग्ण सापडले असून यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील दोन बाधितांचा समावेश आहे.

सांगलीतील शिंदे मळ्यातील 60 वर्षीय पुरुष आणि बुरुड गल्लीतील 73 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर ग्रामीण भागातील सात बाधितांमध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील महिला, पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथील 52 वर्षीय पुरुष, बुधगाव येथील 42 वर्षीय पुरुष आणि पलूस येथील 95 वर्षीय वृध्देचा समावेश आहे.

सांगलीतील रमामातानगरमधील माने प्लॉटमधील बाधित 80 वर्षीय आणि मिरजेतील सुंदरनगरमधील 78 वर्षीय अशा दोन महिलांचा कोरोनाने बळी घेतला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. एकाच दिवशी दोन बाधितांचा कोरोनाने बळी घेतल्याने सांगली जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 19 वर गेली आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 641 इतकी झाली आहे. यापैकी 318 रुग्ण बरे झाले असून 304 रुग्ण उपचार घेत आहे. यापैकी 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळे येथील बाधित 70 वर्षीय वृध्देचा रविवारी कोरोनाने बळी घेतला असून तिच्यावर भारती हॉस्पीटलमध्ये उपाचार सुरु होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER