
कोल्हापूर : संचार बंदीच्या काळात रायगड कोल्हापुरात बनावट पाच द्वारे आलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले. याबाबत मिळालेली माहिती अशी, संचारबंदी सुरू असताना लोकांना प्रवास करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई पास ही सुविधा सुरू केली आहे.
या सुविधेचा काही लोक गैरवापर करत आहे. शुक्रवारी वडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशाच पद्धतीने एक टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक MH 04 GO 97 हे वाहन येथे आले असता, त्या वाहनाची तपासणी करताना त्यावरील चालक खुर्शीद मोहम्मद, जान मोहम्मद, शेख राह याने पितांबर लाईन, कटोरी, माहीम येथून प्रशांत या नावाच्या व्यक्तीशी संगणमत करून, जिल्हाधिकारी रायगड यांनी संचारबंदी च्या काळात दिलेल्या पासमध्ये फेरफार करून प्रवास केला. बनावट पास खरे असल्याचे प्रदर्शित करून शासनाची फसवणूक केली व चालक खुर्शिद जान याने वाहनावर बनावट पास चिटकवून ताब्यातील वाहनात प्रवासी बसवून प्रवास करताना मिळून आला. ही बाब निदर्शनास आल्याने, प्रशांत (रा. नालासोपारा) चालक व खुर्शीद जान( रा. पितांबर लाईन कटा कटोरी माहीम) यांचेवर वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि प्रशांत निशाणदार हे करत आहेत.
तसेच आशिष चौरसिया राहणार नगर चेंबूर याने व चालक मंगेश सुरेश कासारे (राहणार नालंदा नगरी घाटकोपर मुंबई) यांनी आपसात संगणमत करून अशिष चौरशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांचे कार्यालयातून संचार बंदीच्या काळात मिळालेल्या प्रवास पास मध्ये फेरफार केला. हे बनावट पास खरा असल्याचे प्रदर्शित करून शासनाची फसवणूक केली. त्याद्वारे मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करताना वाहन क्रमांक MH 03 CV 47 74 मध्ये मिळून आल्याने त्यांच्यावर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक खान हे करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला