नाना पटोले यांच्या बंगल्यावरील दोन कर्मचारी कोरोनाबाधित

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना (Ministers In Mahavikas Aaghadi Govt) झालेल्या कोरोना संक्रमणाची यादी पाहिली तर राज्यात कोरोना ज्या वेगाने पसरला नसेल, त्याहूनही अधिक वेगाने कोरोना राज्याच्या मंत्रिमंडळात (Maharashtra State Cabinet Corona) पसरलेला पाहायला मिळतो आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बंगल्यावरील दोन कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पटोले विलगीकरणात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवजयंतीच्या कार्यक्रमाला नाना पटोले अनुपस्थित आहेत. तसेच पटोले यांना हलका ताप असल्याने कोरोना चाचणी करण्याची शक्यता आहे .

दरम्यान नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER