उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे दोन फोटो जे मराठी माणसाला हवेहवेसे वाटणारे!

मुंबई : शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुतळ्याचे राजकीय दिग्गजांच्या हजेरीत मोठ्या थाटामाटात अनावरण करण्यात आले आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर आले. दोन्ही नेते एकत्र आले आणि मराठी माणसाला सुखद दिलासा मिळाला.

कुलाब्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात काल शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांना पाचारण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसही या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच सर्वांचे आकर्षण ठरले. या सोहळ्याला राज यांच्याबरोबर अमित ठाकरेही उपस्थित होते. तर उद्धव ठाकरे हे कुटुंबासह आले होते. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी ठाकरे कुटुंब एकाच मंचावर आलं होतं.

दोन्ही भाऊ बऱ्याच कालावधीनंतर एकाच मंचावर आल्याने शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनीही मोठी गर्दी केली होती. मीडियाने यावेळी प्रचंड गर्दी केली होती.

उद्धव ठाकरे आणि राज एकत्र आल्यानंतर मीडियाचे सर्व लक्ष दोन्ही नेते एका फ्रेममध्ये कसे येतात याकडे लागले होते. दोन्ही नेत्यांना एका फ्रेममध्ये टिपण्यासाठी मीडियाची धडपड सुरू होती अन् तो क्षण येताच अक्षरश: क्लिकचा पाऊस पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER