सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात दोन व्यक्ती कोरोना बाधित : डॉ.अभिजीत चौधरी

सांगली :- धारावी येथून आलेल्या व्यक्तींपैकी 20 व्यक्ती ॲडमिट करण्यात आल्या असून त्यातील 14 जणांच्या स्वाबचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. यातील 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 37 वर्षीय एका महिलेचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला सुट्टीसाठी उत्तर शिवाजी नगर सांगली येथे येणार होती. तथापि या सर्व लोकांना इस्लामपूर येथेच ताब्यात घेऊन त्यांची रवानगी मिरज आयसोलेशन कक्षाकडे करण्यात आली आहे

वाळवा तालुक्यातील चांदोली वसाहतीतील 22 वर्षीय पुरुषाची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली असून सदर व्यक्ती पुण्याहून चांदोली वसाहत येथे आलेली आहे.

सांगलीतील लक्ष्मी नगर येथील 52 वर्षीय कोरोणाबाधित रुग्ण उपचाराखली असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु त्या व्यक्तीला फुफ्फुसाचा टीबी असून या व्यक्तीची प्रतिकारशक्ती अत्यंत कमी आहे. या कोरोणा बाधित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून सदर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.

खानापूर तालुक्यातील बलवडी येथील 55 वर्षीय पुरुष कोरोणाबाधित व मोहरे येथील कोरोना बाधित रुग्ण हे दोघे ऑक्सिजन’वर असून अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.

सांगली येथील रेव्हेन्यू कॉलनीतील कोरोणाबाधित महिलेचा 14 दिवसानंतर चा कोरोणा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER