मुंबईतील कोविड रुग्णालयाला भीषण आग, दोन रुग्णांचा होरपळून मृत्यू

Covid Hospital - Maharastra Today

मुंबई :- भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस या कोविड रुग्णालयाला रात्री १२च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रुग्णालयात ७६ रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही.

भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. त्यामुळे या आगीत होरपळून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER