आयपीएलमध्ये 99 वर नाबाद दोन आणि बाद तीन

IPL

आयपीएलच्या (IPL) कालच्या चित्तथरारक सामन्यात इशान किशनचे (Ishan Kishan) शतक फक्त एका धावेने हुकले. विजयासाठी दोन चेंडूत पाच धावा हव्या असताना तो बाद झाला आणि आयपीएलमध्ये 99 धावांवर परतलेला (बाद किंवा नाबाद) पाचवा फलंदाज ठरला. मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आपल्या पहिल्याच खेळीत त्याने 58 चेंडूत दोन चौकार व नऊ षटकारांसह 99 धावा केल्या.

दुर्देवाने त्याच्या या खेळीने मुंबईला सुपर ओव्हरपर्यंत तर पोहोचवले पण सामना काही जिंकता आला नाही. याप्रकारे हुकलेले शतक आणि संघाचा पराभव अशी दुहेरी निराशा त्याच्या पदरी पडली. यापूर्वी अशी दुहेरी निराशा ख्रिस गेलच्याही पदरी पडली होती.

केवळ एका धावेने शतक हुकलेला इशान किशन हा कोहली, ख्रिस गेल, सुरेश रैना आणि पृथ्वी शाॕ यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय. यापैकी सुरेश रैना व ख्रिस गेल हे दोघे 99 धावांवर नाबाद परतले आहेत. तर पृथ्वि शॉ हा शेवटच्या षटकाआधीच 99 धावांवर बाद झालेला एकमेव फलंदाज आहे.

आयपीएलमधील 99 धावांच्या खेळी अशा…

1) सुरेश रैना (Suresh Raina) (सीएसके) – नाबाद 99
वि. सनरायजर्स, हैदराबाद 2013

2) विराट कोहली (Virat Kohli) (आरसीबी) – 99
विरुध्द दिल्ली डेअरडेविल्स, 2013

3) ख्रिस गेल (Chris Gayle) (किंग्ज इलेव्हन पंजाब) – नाबाद 99
विरुध्द राॕयल चॕलेंजर्स, 2019

4) पृथ्वी शॉ (Prithwi Shaw) (दिल्ली कॕपिटल्स)- 99
विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स, 2019

5) इशान किशन (Ishan Kishan) (मुंबई इंडियन्स)- 99
विरुध्द राॕयल चॕलेंजर्स, दुबई, 2020

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER