राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मंत्रिपद? शरद पवारांशी बोलण्याचे सुप्रिया सुळेंचे आश्वासन

Sharad Pawar-Supriya Sule

औरंगाबाद : पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) आणि शिक्षक मतदार संघातील आमदार विक्रम काळे यांची मंत्रिपदाची मागणी अत्यंत योग्य आहे. ती आपण पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील (Jayant Patil) आणि पक्ष प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) साहेबांपर्यंतपोचोवणार असल्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली. खासदार सुळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी सुळे म्हणाल्या की, पदवीधर मतदार संघ किंवा शिक्षक मतदार संघ या दोन्ही मतदारसंघातील मतदार हे शिकलेले आणि विचार करून मत देणारे आहेत. असे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत नाही असा आपला गैरसमज आहे. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी हा गैरसमज दूर केला. आमदार चव्हाण यांनी विक्रम काळे किंवा मला शिक्षण मंत्री पद द्या अशी मागणी भाषणात केली होती. याविषयी बोलताना शिक्षण मंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसून काँग्रेस पक्षाकडे असल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही अशक्य नसल्याचं देखील सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ; भाजप नेत्याची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER