सांगली जिल्ह्यात खुनाच्या दोन घटना

Murder

सांगली :- सांगली जिल्ह्यातील मंगळवारी दोन खूनाच्या घटना घडल्या. कुपवाड एमआयडीसीत अनैतिक संबधाच्या कारणावरुन दोघां भावासह तिघांनी सचिन अण्णासाहेब सुतार (वय 30) याचा भररस्त्यावर सव्वा आठवाजण्याच्या सुमारास खून केला तर तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घर वाटणीच्या वादातून पुतण्याने चुलता भीमराव तुकाराम गाडे (वय 55) यांचा गळा चिरून त्यांची हत्त्या केली.

कुपवाड एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च नजिकच्या शिवशक्तीनगरमध्ये राहणारा सचिन सुतार हा आपल्या मेहुणा आणि अन्य एकासह दूचाकीवरुन निघाला असताना संशयीतांनी पाठीमागून धडक देवून त्याला दूचाकीवरुन खाली पाडले. तो खाली पडताच तिघांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने सपासप पन्नास पेक्षा अधिक वार केले. सचिन याच्यावर हल्ला होत असताना त्याचा मेहुणा आणि बरोबर आलेल्या दुसर्‍यानेही तेथून पळ काढला. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या खूनाचा छडा लावताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काही तासातच मुख्य हल्लेखोरासह दोघांना अटक केली. संशयीत चरणराज कमलाकर मोहिते (वय 28) आणि त्याचा मेहुणा आकाश संतराम सनदी (वय 23, दोघेही रा. शिवशक्तीनगर) या दोघांना सांगलीतील शंभरफुटी परिसरातून अटक करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : Two murders in sangli district

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)