बोनी कपूरच्या घरात काम करणारे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Boney kapoor Staff Member Corona Positive

मुंबई : काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे बोनी कपूर यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. आता त्यापाठोपाठ त्यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले असून घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सध्या बोनी कपूर हे त्यांची आणि दोन्ही मुलींची काळजी घेत आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापूर्वी बोनी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे, ‘आमच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो शनिवारी संध्याकाळपासून आजारी होता. त्यामुळे आम्ही त्याला कोरोना चाचणी करण्यासाठी पाठवले असून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.’


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER