
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील कशेळी येथील आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही व्यक्ती 16 मे रोजी मुंबईतून आल्या होत्या. 18 मे रोजी त्यांचे स्वॅब घेतले गेले होते. आज त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून, दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 127 झाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला